असत्याला ललकारण्याची, आव्हान देण्याची, प्रश्न विचारण्याची गरज आहे. द्वेषाच्या या वातावरणात परस्परांवर प्रेम करणं, हासुद्धा विद्रोह ठरू शकतो

सध्याची लढाई अशा विचारधारेशी व अशा संघटनेशी आहे की, ज्याचा स्वतःचा असा आखाड्यात उतरवण्यासाठी पैलवानच नाही. म्हणून ते आपल्याला आपल्यातच लढवतात. महात्मा गांधींविरुद्ध महात्मा फुले, गांधींविरुद्ध आंबेडकर, गांधींविरुद्ध नेताजी सुभाषचंद्र बोस, गांधींविरुद्ध भगतसिंग, नेहरूंविरुद्ध पटेल अशा लढाया त्यांनी लावल्या आहेत. या विषमतावाद्यांचा कोणताही नेता त्यांच्या संघटनेशिवाय जनमानसांमध्ये मोठा होऊ शकत नाही.......

‘त्यांच्यासोबत’ असाल तर स्वच्छ आणि विरोधात असाल तर गलिच्छ! ‘त्यांच्या’ बाजूनं असाल तर ‘देशभक्त’ आणि विरोधात जाल तर ‘देशद्रोही’!

भाजप म्हणजे ‘हिंदुस्थान’ आणि विरोधक म्हणजे डायरेक्ट ‘पाकिस्तान’, अशा प्रकारे बटबटीत पद्धतीने देशांतर्गत विभाजन सुरू आहे. काळ तर कठीण आहेच. आणि म्हणूनच ‘विद्रोही’ संमेलनासोबत राहून विद्रोहाचीही गरज आहे. कसाबला फाशी दिली गेली, तेव्हा सार्‍या देशाने आनंद व्यक्त केला, पण या देशातील सरकारच्या ‘कसाब’नीतीमुळे शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतात, याबाबत फारसं दुःख या देशातील जनतेला आहे असं वाटतं नाही.......

घोषित नसली तरी ‘अघोषित आणीबाणी’ तर निश्चितच आहे. वातावरण विषाक्त बनवले जात आहे. ‘भया’चे वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे

हे विद्रोही साहित्य संमेलन आहे. विद्रोही या शब्दाचा अर्थ ‘अन्यायाविरुद्ध लढा’ उभारणारे असा आहे. प्रस्थापित किंवा प्रतिष्ठापना केल्या गेलेल्या असत्याला सत्यानं ललकारणं, आव्हान देणं, प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह. विद्रोहाचं नातं सत्याशी असतं. सत्तेद्वारे जेव्हा असत्याची प्रतिष्ठापना होते, ते प्रस्थापित होतं, त्या वेळी सत्य त्याला आव्हान देतं. सत्यानं असत्याला ललकारणं, आव्हान देणं म्हणजे विद्रोह.......